‘फ्लाईंग सिख ‘ मिल्खा सिंग यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी या महान खेळाडूला श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल धारावी येथे मुंबई शहरातील खेळाडू व प्रशिक्षक यांच्यासोबत श्रद्धांजली वाहिली. सादर कार्यक्रमास नवनाथ फरतडे- जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर, याच्या सोबत अभय चव्हाण, सुमित पाटील, भारती देविकर, किक बॉक्सिंग प्रशिक्षक – उमेश मुरकर, राहुल साळुंखे, विघ्नेश मुरकर , विजय पडीयाची, संकुलातील कर्मचारी व खेळाडू यांनी उपस्थित राहून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.
फ्लाईंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन झाले. मिल्खा सिंग यांच्यावर गेल्या एक महिन्यापासून करोनावर उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी रात्री ११.३० वाजता त्यांची प्राणज्योज मालवली. याआधी रविवारी त्यांची पत्नी निर्मल कौर यांचेदेखील करोनामुळे निधन झाले होते. मिल्खा सिंग यांच्या पश्चात त्यांचा मुलगा गोल्फपटू जीव मिल्खा सिंग आणि तीन मुली आहेत. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com