कोकणातील लोक कला जोपासण्यासाठी “कोकण नमन कलामंच “ची स्थापना

रत्नागिरी : उक्षीतील हरिश्चंद्र बंडबे, सामाजिक कार्यात अग्रेसर असं व्यक्तिमत्व. उक्षी गावचे उपसरपंच पदाची भूमिका बजावत असून. अनेक सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. जाकादेवी पंचक्रोशी मध्ये त्यांच्या या समाजसेवेमुळे ही ओळख निर्माण झाली आहे. त्यातच आनंदाची गोष्ट म्हणजे श्री. हरिश्चन्द्र बंडबे यांची रत्नागिरी तालुका “कोकण नमन कलामंच” सदस्य पदी निवड झाली.

हरिश्चंद्र बंडबे, सामाजिक कार्यकर्ते

नमन ही पारंपारिक लोककला कोकणातील असून, प्रथमच या कलेला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कोकण नमन कलामंचाची स्थापना करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील जवळ जवळ 127 पेक्षा जास्त नमन मंडळे एकत्रित येऊन . या मंडळाची नवीन कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे आहे.

अध्यक्ष -प्रभाकर कांबळे, संस्थापक व कार्याध्यक्ष- श्रीधर कांबळे, उपाध्यक्ष -अरुण कळबटे, सचिव – विश्वनाथ गावडे, सहसचिव – सुरेश होरंबे, खजिनदार -सुरेश येजरे, उपखजिनदार – पांडुरंग होरंबे, संपर्क प्रमुख – श्रीकांत बोंबले, प्रसिद्धप्रमुख -विजय पाडावे, सदस्य -वसंत साळवी, विलास भाताडे, प्रमोद होरंबे, मनोज घवाळी, महादेव कळंबटे, सचिन तांबे, अमित डांगे, प्रवीण कळंबटे, संतोष धनावडे, संजय गावडे, सुरेश दसम, हरिश्चन्द्र बंडबे, सुनील लोगडे, दिनेश शितप.

कोकणातील नमन या कलेला तसेच त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना राजाश्रय मिळावा आणि येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही संघटना तत्पर राहील. हे संस्थेचे उद्दिष्ट राहील.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com