मीरा ट्विंकल सेवाभावी संस्थेच्या वतीने  मुंबईतील आझाद मैदानात एल्गार…….

मुंबई : मीरा ट्विंकल या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आज मुंबई येथे धरणे आंदोलनसाठी हजारोंच्या संख्येने सभासद उपस्थित होते ,त्यात अनेक पीडित गुंतवणूकदार सभासद होते ..मुंबई स्थित ओम प्रकाश बन्सीलाल गोएंका यांच्या रॉयल ट्विंकल, सिट्रस चेक इन्स या कंपनीने केलेल्या रुपये ११००० कोटीच्या महा आर्थिक घोटाळ्यात संपूर्ण भारत देशातील अठरा लाख गुंतवणूकदारांची घोर फसवणूक झालेली आहे .या संदर्भात भारताच्या मा. सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एम पी आयडी कायदा आहे ,आणि अशाच प्रकारचे इतर राज्यातील गुंतवणूकदारांनाही कायद्याचे संरक्षण आहे, असे असूनही तपास यंत्रणाच्या उदासीनतेमुळे पीडित गुंतवणूकदारांना कोणी वाली नाही ,सामान्यांच्या प्रश्नांची दाखल घ्यायला आज राज्यकर्त्यांकडे वेळ नाही. शासनाचे, प्रशासनाचे ,तपास यंत्रणाचे लक्ष वेधून घेण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले
या मोर्चामध्ये महिलांचा ,गृहिणींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. ११००० कोटी रुपये अजून सामान्य गुंतवणूकदाराचे अगदी तळागाळातल्या लोकांचे कष्टकरी,अडाणी अशिक्षित कामगार महिला वर्गाची त्यांनी जमा केलेली पुंजी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक यांच्या तोंडचा घास पळविणाऱ्या, लोकांची दिशाभूल करणाऱ्या ओम प्रकाश बन्सीलाल गोएंका यांना कड्क शासन व्हावे व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे त हाच या सर्व मोर्चामध्ये महिलांचा आक्रोश होता.

या मोर्चाच्या आयोजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्षा, सौ राजश्री गाडगीळ,केतकी महाजन, संदीप शहा ,संभाजी केंडे ,भाऊ पवार ,रोहिदास रानवडे, विशाल पाटील ,राम दयाळकर, घनश्याम जोशी, सारिका बुचडे ,भाग्यरेखा आगाशे यांनी केले होते मुंबई मधुन विजय घरट, श्यामसुंदर कामतेकर, रमेश गराटे, प्रभाकर राणे, रमेश तळेकर, डी पी सोलकर, प्रशांत मसुरकर, दादासाहेब गोरड, वासुदेव माने. विजय सावंत, दिपक पाटील,‌एकनाथ प्रभू,सुरज सुर्वे, दसंम अनंत सोलकर, माणिक थोपटे, विनोद नाईक, यांचे सहकार्य लाभले.
पालघर मधून गजानन किनी, गजारा मॅडम, मोहिनी पाटील, मात्रे.
देवगड,मधून चिपळूण. नांदेड.गुजरात, नवसारी, पालघर, पुणे, पिंपरी, चिंचवड , मुंबई असे महाराष्ट्र राज्यातील लोक आले होते.
या कंपनीचे कमिटी मेंबर महेश पावसकर,चंद्रकांत भोजणे, घाडगे,म्हादे, अनंत काजारे, धोंडू पागडे, नरेंद्र म्हाडीक, मंगेश काजारे, एस आर जाधव, इंदुलकर, असे चाळीस कोर कमिटी मेंबर त्याचप्रमाणे संचालक श्री उतेकर श्री नटराजन श्री कोटणीस यांच्याही संपत्तीची सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई व्हावी याची मागणी या मोर्चात करण्यात आली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com