एकता कला गौरव विजय कदम यांना प्रदान

मुंबई : एकता कल्चरल अकादमीचा ३३वा एकता सांस्कृतिक महोत्सव मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे दणक्यात साजरा झाला. या समारंभात सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते विजय कदम यांना विशेष एकता कला गौरव अर्थात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या सत्काराला उत्तर देताना त्यांचे डोळे भरून आले होते. सगळ्याच गुरूजनांची आठवण काढताना आज विजय कदम म्हणून ज्याला तुम्ही ओळखता ती ओळख ह्या दिग्गजांनी मिळवून दिली, हे अगदी नम्रपणे मान्य करतात. मी फक्त पालखीचा भोई आहे, हे त्यांचेच शब्दच सारं काही सांगत होते. माणसाने जमिनीवरच राहायचं, तरच यशस्वी होता येतं असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरूवात प्रकाश जाधव (एकता अध्यक्ष), अजय कांडर (प्रसिद्ध कवी), डॉ. रमेश यादव (हिंदी साहित्यिक), अशोक बेंडखळे (साहित्यिक), उल्हास महाले (उपमुख्य अभियंता मुंबई उपनगर-१), प्रमोद पवार (अभिनेते), शैलेश नाईक (उपाध्यक्ष रिलायन्स), सदानंद राणे, अनिल सुतार (नृत्य दिग्दर्शक) आणि विजय कदम (अभिनेते) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तद्नंतर सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्यास रंग भरण्यास आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात निकिता गायकवाड, जुही चव्हान, भावेश सोळंकी (गायन), सिद्धेश शिंदे, शशिकांत नागरे (अभिनय), आणि तुषार मांडवकर यांनी कविता सादर केली.
ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार, एकताचे सचिव बाळाराम कासारे, एकताच्या सक्रिय कार्यकत्या सुनयना गोसावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
अभिनयासाठी प्रिया तेंडुलकर स्मृती पुरस्कार प्रज्ञा जाधव यांना, साहित्यासाठी दया पवार स्मृती पुरस्कार इकबाल मुकादम यांना, साहित्यासाठी नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार वैभव साटम यांना, संगीतासाठी सुधीर फडके स्मृती पुरस्कार मनोज आचार्य यांना, पत्रकारितेतील जयंत पवार स्मृती पुरस्कार प्रसाद जोशी यांना, पत्रकारितेतील नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्कार विजय साखळकर यांना, शैक्षणिक सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार विद्या प्रभू यांना, नृत्यासाठीचा सुबल सरकार स्मृती पुरस्कार नृत्यांगना कादंबरी वाझे यांना, साहित्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृती पुरस्कार शिरीष नाडकर्णी यांना, समिक्षणासाठीचा प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार कमलाकर राऊत यांना, लोकजागराचा व्ही. शांताराम स्मृती पुरस्कार आकाश घरत यांना, समाजसेवेसाठी संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार प्रशांत देशमुख यांना, समाजसेवेसाठी मास्टर दत्ताराम स्मृती पुरस्कार हर्षद आचार्य यांना, समाजसेवेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार संदेश निकम यांना, समाजसेवेसाठी महात्मा जोतिबा स्मृती पुरस्कार सतीशकुमार साळुंके यांना, समाजसेवेसाठी बिरसामुंडा स्मृती पुरस्कार सुरज भोईर यांना, समाजसेवेसाठी बाबा आमटे स्मृती पुरस्कार चंद्रकांत करंबळे यांना, समाजसेवेसाठी दादासाहेब गायकवाड स्मृती पुरस्कार मगन सोलंकी यांना, समाजसेवेसाठी बाळाराम रामा कासारे स्मृती पुरस्कार अश्विनी अनिल कांबळे, समाजसेवेसाठी वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार सोमनाथ ओझर्डे अशा विविध क्षेत्रामधील व्यक्तींना एकता पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच विजय लक्ष्मी कदम, उज्ज्वला विचारे, शाम चव्हान, नितीन कांबळे, भाग्यलक्ष्मी पडसळगीकर आणि महेंद्र जाधव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
अतिशय नीटनेटक्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकताचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.अवधूत भिसे यांनी केले. एकतातर्फे घेण्यात आलेल्या अभिनय, गायन, काव्यवाचन, काव्यलेखन, नृत्य या स्पर्धांमधील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, समन्वयक श्वेता जाधव यांच्यासह राजेश जाधव, सागर कासारे, दिनेश मोरे, प्रियंका जाधव, भाग्यलक्ष्मी पडसलगीकर, विशाल संगारे, श्रुती मोरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com