शिक्षणसमिती अध्यक्षा मा. संध्या दोषी यांच्या दालनातील सभेत शाळेची इमारत बृहन्मुंबई मनपाला हस्तांतर करून शाळा सुरू करण्याचा एक मताने निर्णय


संघर्ष नगर मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून आलेल्या 12000 हजार कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक संघर्षानंतर एक प्राथमिक शाळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत 2014 साली बृहन्मुंबई मनपाला हस्तांतरण करण्यात आली. व आज ही त्या ठिकाणी विविध माध्यमाची एकूण 2800 विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षण घेत आहेत. त्याच प्रमाणे संघर्ष नगर वसाहतीची लोकसंख्या पाहता त्या शाळेची जागा अपुरी पडते आहे त्याच प्रमाणे संघर्ष नगरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ( इयत्ता 9 वी ते 12 वी ) उपलब्ध नाही. उपलब्ध व्हावी म्हणून निवाराच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून पाठपुरावा चालू होता. त्यांचाच परिपाक म्हणून आज शिक्षण समिती अध्यक्षा मा. संध्या दोषी यांच्या दालनात मनपाच्या विविध खात्याचे अधिकारी, एस आर ए , वन विभाग, यांचे अधिकारी व निवाराचे प्रतिनिधी यांची शिक्षण समिती अध्यक्षा मा. संध्या दोषी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
सदर बैठकीत जनतेच्या मागणीनुसार व हितासाठी आर्थिक दृष्टिकोनातून परवडेल अशी शाळा पहिली शाळा ज्या धर्तीवर मनपाने घेतली त्याच धर्तीवर शाळा इमारत ताब्यात घेऊन शाळा चालू करावी. या साठी गृहनिर्माण मंत्री यांनीही मनपाला हस्तांतर करावे असे निर्देश दिले आहेत त्यामुळे सदर शाळा इमारत हस्तांतर करून मनपाच्या वतीने शाळा सुरू करावी अशी मागणी निवाराच्या वतीने संजय डावरे सर यांनी मांडली. यावर सर्व अधिकारी यांनी आपले म्हणणे मांडून शेवटी सदर शाळा मनपाला हस्तांतर करण्याचे सर्वानुमते ठरले. याची कार्यवाही त्वरित करावी असे निर्देश दोषी मॅडम यांनी दिले.
संघर्ष नगर वासीयांच्या वतीने दोषी मॅडमची आभार प्रकट करण्यात आले. या वेळी निवाराच्या वतीने संजय डावरे सर यांच्या सह रावण गायकवाड, अशोक पाटील ,वसंत, खाडे, अनंत जोशी, प्रकाश शिंदे उपस्थित होते.