पडद्या मागील लढवय्या डॉक्टर अनिल पाचनेकर, समाजासाठी समर्पित सेवेबद्दल कौतुक पुरस्कार

आपले रोजचे जीवन जगत असताना अशी फार कमी माणसे असतात की ज्यांना आपणास मनापासून भेटावे असे नेहमी वाटतं असते, माझ्या जीवनातील अशीच एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनिल पाचनेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष – इंडियन मेडिकल असोसिएशन., शांत व सुस्वभावी, नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य असणारी व्यक्ती, डॉक्टरांचा व माझा परिचय हा १९८८ साली झाला. त्यावेळी माझा मित्र रामदास डीगे हा त्यांच्या दवाखान्यात कामाला असल्याकारणाने माझी ओळख डॉक्टर पाचनेकर यांच्याशी झाली, आजच्या घडीला जीवनात मागे वळून पाहताना डॉक्टरांनी धारावीत राहून येथील लोकांकरिता जे योगदान दिले आहे, त्याचे मला नेहमी कौतुक वाटत आले आहे, मला आठवते आहे की त्यांच्या दवाखान्यात रात्री १ वाजेपर्यंत पण ते रुग्णांना तपासात असतं, मला या गोष्टीचे नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे, ह्या माणसाला एवढी एनर्जी कोठून मिळत असेल. पण जर तुम्ही मनापासून लोकसेवा करण्याचे व्रत घेतले असेल तर, या सर्व गोष्टी शुल्लक वाटू लागतात. असे डॉक्टर लाभणे हे धारावी करांचे भाग्यच आहे हे मी मानतो. आज गेले ९ महिने ज्या पद्धतीने डॉ अनिल पाचनेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून धारावीमध्ये जे घराघरात जाऊन कोरोना तपासणीचा उपक्रम राबवला, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात लोकांना वेळीच उपचार मिळाले, व कित्येकांचे प्राण वाचले. याचीच दखल घेत आज डॉ. अनिल पाचनेकर यांना श्री रमेश नांगरे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धारावी पोलिस स्टेशन यांच्या हस्ते कोरोना महामारीच्या वेळी समाजासाठी समर्पित सेवेबद्दल कौतुक पुरस्कार मिळाला. ” पाचनेकर डॉक्टरांना पंचनामा गुन्हेगारीचा – पोलीस न्यूज तर्फे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
प्रतिनिधी – उमेश मुरकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com