मुंबई :शिवसेना – युवासेना कुलाबा विधानसभा शाखा क्र. २२२ व युवा व्हिजन* यांनी आयोजित केलेल्या घरगुती रांगोळी स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे पार पडला सोबत दर्जेदार मराठी हिंदी गाण्यांचा वाद्यवृंद कार्यक्रम, या स्पर्धेत एकूण ५०० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्या सर्व स्पर्धकांना आयोजकांकडून भेटवस्तू देण्यात आली व तीन गटात एकूण २४ मुख्य पारितोषिक देण्यात आले या प्रसंगी सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री सौ. सुलेखा तळवलकर, शिवसेना सचिव व खासदार मा. श्री. अनिल देसाई, खासदार मा. श्री. अरविंद सावंत, ज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक मुळे काका श्री. रवींद्र मिर्लेकर उपनेते, श्रीमती मीनाताई कांबळी उपनेत्या, श्री. पांडुरंग सकपाळ विभागप्रमुख, सौ. जयश्री बाळलिकर विभाग संघटक, या कार्यक्रमाचे आयोजन प्रथमेश सकपाळ युवासेना कुलाबा विभाग अधिकारी, निलेश देवळेकर शाखा प्रमुख २२२, माधुरी पेंढारी शाखा संघटक २२२ यांनी केले होते.
