जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०१९-२० हिमानी ( मल्लखांब ), श्रेया ( पॉवरलिफ्टिंग ), ऊर्मिल ( आर्टिस्टिक जिन्मास्टिक ), उषा ( तलवारबाजी ) याना पुरस्कार

मुंबई दि. २६ जानेवारी
जिल्हयातील खेळाडूंच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक राक्रीधो-२०१८/प्र.क्र.१२७/क्रीयुसे-२ दिनांक २४/०१/२०२० मधील परिशिष्ठ ‘अ-६’ मध्ये दर्शविलेल्या नियमावलीनुसार महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या व जिल्हा क्रीडा पुरस्कार नियम, २०२० मधील नियम क्र-११ परिशिष्ट ‘अ-१’ मध्ये नमूद केलेल्या खेळांपैकी दरवर्षी जिल्हयातील एक पुरुष व एक महिला, एक दिव्यांग असे तीन गुणवंत खेळाडू, १ गुणवंत मार्गदर्शक, यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची तरतूद आहे. या वर्षी कु. हिमानी उत्तम परब,( मल्लखांब ) कु. श्रेया सुनिल बोर्डवेकर ( पॉवरलिफ्टिंग ), ऊर्मिल जयंत शाह ( आर्टिस्टिक जिन्मास्टिक ), श्रीमती उषा तुकाराम शिर्के ( तलवारबाजी ) असे पुरस्कार पटकावीत बाजी मारली. जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, व रोख रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) असे आहे. वितरण समारंभास श्री. राजीव निवटकर, आयएएस, जिल्हाधिकारी, नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी , मुंबई शहर, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com