सोलापूर मध्ये जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा संपन्न

सोलापूर: दि ८ मे 2022 रोजी सोलापूर येथे जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये आरोही स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली,या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा व शहर मधून 164 खेळाडूनी सहभाग नोंदवला होता , या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी श्री सत्यम जाधव सर यांनी केले, विजेते खेळाडू पुढील प्रमाणे सुवर्णपदक विजेते : संस्कार वागज, स्वराज वाघमारे, समर्थ वाघमारे , माऊली करंडे, सत्यम पवार, समीर तांबोळी, ईशान तांबोळी, जैद तांबोळी, प्रेम कदम, राधा अवताडे, आदिती भांगे , मैथिली भांगे, वर्षा भांगे, पृथ्वीराज भांगे, पृथ्वीराज गिड्डे, निखिल लवटे, अवधूत भांगिरे , प्रतीक सूर्वे तर रौप्यपदक विजेते – शिवराज डोंगरे, श्रीपाद भांगे आजच्या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू म्हणूनही त्याची निवड करण्यात आली, विजेता सर्व खेळाडूंचे अभिनंदन क्रीडा अधिकारी सत्यम जाधव सर यांनी केले व या स्पर्धेसाठी त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले व सर्व खेळाडूंना या तापमान जास्त असताना सुद्धा खेळाडूनी केलेल्या भरपूर सराव केला त्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांच्या सरावाचे कौतुकही केले, व मुलांनी या तापमानात रोज 2 ते अडीच तास केलेल्या सरावांचे त्यांना फळ मिळाले. या स्पर्धेमध्ये क्लबचे सीनियर खेळाडू अश्विनी वागज ,दीक्षा पवार ,ओंकार वागज, सिद्धेश्वर रणदिवे,बिरुदेव पुजारी ,प्रसाद सावंत, यांनी स्पर्धेत क्लब च्या खेळाडू ना सहकार्य केले, या सर्व खेळाडू ना मार्गदर्शन श्रीकांत पुजारी यांनी केले

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com