मुंबई : आज पोलीस स्मृती दिनानिमित्त मा. श्री. विनोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभम मिश्रा व फुलाजी पाटील यांच्या वतीने आज दिनांक २१-१०-२०२१ रोजी मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिसांना श्रीमद् भगवद्गीता च्या मराठी प्रतींचे वाटप करण्यात आले. या वेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चौरे यांनी आदरपूर्वक स्वीकार केला व धन्यवाद दिले. पोलीस खात्यात काम करताना पोलिसांना रोजच्या आयुष्यात कामाच्या स्वरूपामुळे तणाव व त्रास असतो. भारतीय संस्कृती चे प्रतीक असलेल्या भगवद्गीता वाचनामुळे त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल या विचाराने आम्ही ही भेट दिली असे आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना डॉ. शुभम मिश्रा यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक, हवालदार तसेच महिला पोलीसांना देखील श्रीमद् भगवद्गीता च्या मराठी प्रतींचे वाटप करण्यात आले.

