मुंबई : मकर संक्रांतीचे वैज्ञानिकदृष्ट्या, नैसर्गिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. हिंदूंचे सर्व उत्सव हे नैसर्गिक आहेत. मकर संक्रांतीची औचित्त साधून मकर संक्राती निमित्ताने (१४ जानेवारी) हिंदू महासभेच्या महिला कार्यकर्त्यांनी धारावी विभागातील प्राचीन शिव मंदिर येथे येणाऱ्या सुवासिनींना हळदी-कुंकू लावून तिळगुळ दिले व वाण दिला. सदर कार्यक्रमामध्ये हिंदू महासभेचे धारावी अध्यक्ष गणेश कदम, प्रमुख कार्यवाह रमेश कराळे, सह-कोषाध्यक्ष आकाश सोनवणे, महिला प्रमुख निलम कराळे यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रभाकर शिंदे, शुभम पोळ, महेंद्र कदम आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.