धारावीत अग्निरोधक यंत्र वाटप

मुंबई – लाल गंगाधर चाळ या परिसरात लागलेल्या आगी समयी अग्निरोधक यंत्र जवळपास कुठेच उपलब्ध झाले नाही. या आकस्मित घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांनी शिक्षण मंत्री व आमदार प्रा वर्षांताई गायकवाड यांची भेट घेतली व माहिती दिली. अशा प्रकारच्या घटने मध्ये नागरिकांच्या सुरक्षे साठी स्थानिक आमदार यांच्या तर्फे श्री शिवनेरी रहिवासी संघ,अष्टविनायक मित्र मंडळ व लाल गंगाधर चाळ , येथील राहिवासीयांना अग्निरोधक यंत्र च्या वाटप करण्यात आले व आपत्काल समयी त्याचा उपयोग कसा करावा व अग्निशामक यंत्रांचे वर्गीकरण आणि उपयोग काय आहेत ते नागरिकांना सांगण्यात आले. प्रतिनिधी- उमेश मुरकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com