मुंबई : हिंदू धर्मातील लोकं भगवान श्रीशिव शंकराची भक्ती करतात. त्यामुळे हिंदू धर्मात ”महाशिवरात्री“ ला खूप महत्त्वाचे स्थान आहे. महाशिवरात्री निमित्त ०१ मार्च रोजी धारावी विभागातील प्राचीन शिव मंदिर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना हिंदू महासभेच्यावतीने उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धारावी हिंदू महासभेचे अध्यक्ष गणेश कदम, प्रमुख कार्यवाह रमेश कराळे, प्रशांत केणी, महिला प्रमुख निलमताई कराळे, कुमार कदम, अक्षय इंगळे, दिपक माने, मंगेश शिंदे यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रभाकर शिंदे, शुभम पोळ यांनी सहकार्य केले.