
प्रत्येक मानव समान आहे हा संदेश देण्यासाठी आज शिक्षक भारती, छात्रभारती आणि राष्ट्र सेवादलाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत दिव्यांग विद्यार्थांचा शैक्षणिक साहित्य व भेटवस्तु देऊन यथोचित गौरव करत समानता दिवस साजरा करण्यात आला.
सन्माननीय आमदार श्री.कपिल पाटील व श्री.अशोक बेलसरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मैदानासमोरील कार्यालयात पार पडलेल्या या छोटेखानी सोहळ्यासाठी शिक्षक भारतीचे कार्यवाह प्रकाश शेळके,शिवाजी खैरमोडे, दक्षिण विभाग अध्यक्षा राधिका महांकाळ,शरद दळवी,मनीषा काळे,रवी कांबळे,रामदास केरकर,आदी शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी छात्रभारती चे अध्यक्ष रोहित ढाले व राजीव महांकाळ यांचे सहकार्य लाभले.