“स्वामी” तर्फे कॅन्सरग्रस्तांना ब्लँकेट आणि शिधा वाटप

मुंबई : “स्वामी” सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल अँण्ड एन्व्हायरमेंट, परेल, मुंबई स्थित संस्थेकडून गेली २० वर्षांपासून अनेक उपक्रम राबवले जातात. कॅन्सरग्रस्त रुग्णांना सहाय्य योजना हा त्यातीलच एक उपक्रम दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी संस्थेच्या कार्यालायात घेण्यात आला. त्यामध्ये रुग्णांना ब्लँकेट आणि शिधा वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नितीन तांबे, लक्ष्मण महाडेश्वर, वैशाली शिंदे, वैशाली ढोलम, सुरेखा निमकर, साध्वी डोके, प्रतिभा सावंत, रचना खुळे, नम्रता व्हटकर, विमल माळोदे, प्रतिभा सपकाळे, मोहन कटारे यांच्यासह “स्वामी”च्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com