आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही नागरिकांसाठी चौथी व महत्वाची गरज ठरणार”! अबगुल प्रतिष्ठान संचालक संतोष अबगुल यांचे वक्तव्य……..!!

मुंबई: शहर आपत्ती व्यवस्थापन विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सौजन्याने व संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या( दापोली मंडणगड खेड रत्नागिरी मुंबई आणि उपनगरात कार्यरत) पुढाकाराने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शनिवार आणि रविवार या दिवशी आयोजित करण्यात आले होते .या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण घेण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी शहर आपत्ती व्यवस्थापन महानगरपालिका कार्यालय लोअर परेल” या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले प्रतिष्ठान मार्फत वेगवेगळे लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले गेले आहेत; रक्तदान शिबीर; रुग्णसेवा : मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवण व्यवस्था इत्यादी- स्वतः संतोष अबगुल यांनी प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांचा यात फार मोठा वाटा आहे “आपला स्वतःचा जीव वाचवता ना इतर मित्रांचा जीव कसा वाचविता येईल याचे शिक्षण आपल्याला या प्रशिक्षणातून मिळते. ‘मुंबई व उपनगरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी हे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे प्रशिक्षणातून मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत झाला पाहिजे. प्रशिक्षण घेतलेली कुमारी रोहिणी जाधव आपले मत मांडताना म्हणते की या प्रशिक्षणात खूप चांगले व भरपूर ज्ञान मिळाले. ते मी माझ्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना देखील देणार आहे “
सौ. रश्मी लोखंडे (आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख )या आपले मत व्यक्त करताना म्हणतात; की आपत्ती व्यवस्थापन हे एक टीम वर्क आहे: यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे- मुंबईतील उपनगरातील शाळांमध्ये हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांप र्यंत पोचविण्याचा आमचा मानस आहे. तसेच राजेंद्र लोखंडे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले . या प्रशिक्षणामध्ये प्रवीण ब्रह्मदंडे; श्रीयुत भरतकुमार; अक्षता तांबे श्री हुमणे ‘ बागवे.श्री खांबोकर सर इतर सहकाऱ्यांचे योगदान देखील महत्त्वाचे ठरले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com