महाराष्ट्र राज्य चे शिक्षण मंत्री आमदार प्रा वर्षाताई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितित आज धारावी मतदार संघातील विविध रखडलेल्याबेस्ट च्या स्ट्रीट लाईट संदर्भात बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शाहु नगर गार्डन, एम जी रोड , धोबी घाट, मुस्लीम कब्रस्तान, ६० फीट रोड, ख्वाजा गरीब नवाज चौक, अशोक मिल कंपाउंड, बिस्मिल्ला हॅाटेल जंक्शन, ९० फीट रोड , कुंभार वाडा, मुकुंद नगर , मुरगाण मंदीर , अशोक मिल लेन रोहीदास हॅाल जवळ ईत्यादी सर्व ठिकाणी रस्त्यावरील पथदिवे दुरुस्ती करणे, नविन हायमॅक्स दिवे बसवणे, ९० फीट रोड वरील दिव्यांची क्षमता वाढवणे ईत्यादी कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस बेस्ट चे महाव्यवस्थापक श्री बागडे साहेब, धारावी वार्ड ॲाफिसर दिगावकर उपस्थित होते प्रतिनिधी – उमेश मुरकर