ममता दिनाचे औचित्य साधून दोन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा

ममता दिनाचे औचित्य साधून दोन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आदरणीय नामदार श्री. सुभाष देसाई, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते आज मलबार हिल दूरध्वनी केंद्र येथे संपन्न झाला. सदर रुग्णवाहिका महानगर टेलिफोन निगम कामगार संघ आणि स्थानीय लोकाधिकार समिती निर्मित जाणीव ट्रस्ट च्या वतीने शिवसेना खासदार श्री.अरविंद सावंत यांच्या पुढाकाराने रुग्णसेवेकरिता शिवसेना दक्षिण मुंबईतील शाखा क्र. २२३ व २१६ यांचे शाखाप्रमुख दिलीप सावंत आणि राजेश आवळेगावकर यांना प्रदान करण्यात आल्या.या रुग्णवाहिका गरिबांना मोफत तर इतरांना माफक दरात सेवा देतील.
सदर कार्यक्रमाप्रसंगी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन चे महाव्यवस्थापक श्री. श्रीवास्तव आणि श्री. गव्हारे, शिवसेना उपनेत्या सौ. मीनाताई कांबळी, विभागप्रमुख श्री. पांडुरंग सकपाळ, महिला विभाग संघटक सौ. जयश्री बळ्ळीकर, कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख श्री. अरुण दुधवडकर राजू फोडकर, किरण बाळसराफ व स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख आणि महिला आघाडी शाखासंघटक, एम टी एन एल चे संजय ढोलम, दत्ता भोसले, निनाद शिवगण, आणि संपत ठाकूर, अनिल सिंग हे माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com