गोवा : आज २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. या क्रीडा दिनाचे औचित्य साधून. सिनियर वाको इंडिया किक बॉक्सिंग स्पर्धेच्या समारोपाच्या कार्यक्रम समारंभात २ जुलै हा किकबॉक्सिंग दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. कारण २ जुलै या दिवशी या खेळाला भारत सरकार ची मान्यता मिळाली. यामुळे किक बॉक्सिंग या खेळाला चांगले दिवस दिसत आहेत. या निमित्त पोस्टरचे उद्घाटन लोकेश सिंहल, सीनिअर ॲडिशनल ऍडव्होकेट जनरल, अनिल कुमार सिंहल, वसीम अहमद, संतोष अगरवाल या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.