डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

मुरबाड : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे बुधवारी, १५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७.४० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
सावरकर कुटुंबातील जुन्या पिढीतील ते अखेरचे व्यक्ती होते. मुरबाड येथे ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्याजवळ राहात होते. श्रीहर्ष सावरकर हे गरवारे पेण्ट्समध्ये नोकरीला होते. विक्रम सावरकर यांच्याबरोबर ते हिंदु महासभेचीही काम करीत होते. गेल्या काही वर्षांपासून मुरबाड येथे विक्रम सावरकर यांनी स्थापन केलेल्या आणि सध्या रणजित सावरकर चालवीत असलेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या परिसरातील निवासस्थानी ते राहात होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com