ऑलिम्पिक या शब्दाचा व बोधचिन्हाच्या वापराबाबत निकष !

मुंबई : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन हि एकविध क्रीडा संघटनांची शिखर संघटना असुन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडे अनधिकृत क्रीडा स्पर्धाविषयक विविध तक्रारी प्राप्त झालेल्या असुन सदर तक्रारीच्या अनुषंगाने, ऑलिम्पिक या शब्दाचा वापर करून स्कूल ऑलिम्पिक, रूरल ऑलिम्पिक, स्टूडंट ऑलिम्पिक, जिल्हा ओलिम्पिक अशा प्रकारच्या जिल्हा व राज्यस्तरावर विविध संघटना तयार होत आहेत. या संघटनांच्या माध्यमातून विविध स्तरावर क्रीडा स्पर्धांचे व क्रीडा शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहेत असे निदर्शनास आले आहे.
या जाहिर सुचनेद्वारे सदर संघटनांना सुचित करण्यात येत आहे की महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची परवानगी न घेता ओलिम्पिक या शब्दाचा व बोधचिन्हाचा वापर करून स्पर्धा आयोजन करण्यात येवू नये.

अशा प्रकारच्या मान्यता प्राप्त नसलेल्या क्रीडा संघटनांकडून ऑलिम्पिक या शब्दाचा व बोधचिन्हाचा वापर करून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडू विद्यार्थी, पालक व क्रीडा प्रेमी यांची दिशाभुल करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा क्रीडा संघटनांवर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमार्फत भारतीय दंड संहिता कलम ४१७, ४६५ व ३४ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन चे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी पत्रक काढून जाहीर केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com