
लॉकडाउनच्या काळात लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते याच वेळी लोकां पर्यंत जाऊन गावातील वाड्यांमध्ये जाऊन बँकेच्या विविध योजना, सेवा जनधन खाते ,बचत खाते सरकारी विमा योजना,कृषी कर्ज योजना, आधार सेवा किसान सम्मान निधि योजना इत्यादी बँकांविषयी असलेल्या शंका याबद्दल बँकिंग कॅम्प आयोजित करून एखाद्या बँकेलाही लाजवेल असे काम करणाऱ्या गुहागर तालुक्यातील मुसलोंडी गावातील श्री प्रवीण शंकर बारगोडे यांचा सत्कार तवसाल येथील ग्रामस्थांनी आयोजित केला होता या सत्कार समारंभासाठी गावातील सन्माननीय ग्रामस्थ राष्ट्रीय काँग्रेस पक्ष रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस सन्माननीय विजय मोहिते साहेब त्याच बरोबर तवसाळ गावातील ग्रामस्थ आणि महिला मंडळ उपस्थित होते. अश्या या योध्याचे अविरत काम अखंडित पणे सुरु आहे. पंचनामा न्यूज तर्फे श्री प्रवीण शंकर बारगोडे यांच्या कार्याचे कौतुक व त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
Very good Work Pravinji