मुंबई : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई ११. व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोअर परेल. यांचे संयुक्त विद्यमानाने COVID 19 लसीकरण मोहीम औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई ११ येथे संपन्न झाली.
१५ ते १८ वर्ष वयोगटातील ११० प्रशिक्षणार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून- श्री रमाकांत सखाराम राहाटे, प्रभाग समिती अध्यक्ष. श्री संजय माशिलकर, साहेब प्रतिष्ठान अध्यक्ष-डॉक्टर शैलेश पोल, आरोग्य विभाग एम सी जी एम आणि श्री विनोद शिर्के शिवसेना शाखाप्रमुख २१२
उपस्थित होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई ११ व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेले श्री R. B. भावसार साहेब यांनी पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले . औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोअरपरेल येथील प्राचार्य श्री V. N. खेवलकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरित करून कार्यक्रमास उपस्थित होते.
तसेच श्री संजय माशिलकर साहेबांनी कोरोना काळात त्यांच्यामार्फत केलेले कार्य व अनुभव संस्थेतील मुलांना शेअर केले व लसीकरणाचे महत्त्व सांगितले.
श्री रमाकांत सखाराम रहाटे यांनी COVID 19 च्या काळात नागरिकांना विविध प्रकारे शासनाने कशाप्रकारे मदत कार्य केलं तसेच आरोग्य सेवा पुरवल्या याबद्दल सांगितले . व कोरोना संक्रमण कशाप्रकारे होते व आपण त्याला आळा कशाप्रकारे घालू शकतो याबद्दल सांगितले. तसेच लसीकरना बद्दल मार्गदर्शन केले.
डॉक्टर शैलेश पोल यांनी कोरोना लसीकरणाची माहिती दिली. लसीकरण सुरू झाल्यावर त्यांचे अनुभव प्रशिक्षणार्थी च्या समोर मांडले. लसीकरण यांच्या बाबतीत प्रशिक्षणार्थ्यां च्या सर्व शंकांचं निरसन केलं व सर्व प्रशिक्षणार्थ्यांना लसीकरणासाठी प्रेरित केले. तसेच श्री विनोद शिर्के, शाखाप्रमुख यांनी औद्योगिक क्षेत्रातील आयटीआय चे महत्व सांगून आयटीआय चे प्रशिक्षित मुलांचे कौतुक केले COVID काळात झालेली औद्योगिक हानी भरून काढता येण्यासारखी नाहीये याबाबत विवेचन केले व लसीकरणाचे महत्त्व औद्योगिक क्षेत्रात किती आहे हे पटवून दिले.
पीडब्ल्यूडी विभागाचे सहाय्यक अभियंता इलेक्ट्रिक विभाग यांनी औद्योगिकीकरणात चे महत्व कोरणा लसीकरणाचे चे महत्त्व सांगून प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहित केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री R. B. भावसार साहेब यांनी प्रशिक्षण घेताना लसीकरणाचे किती गरज आहे हे प्रशिक्षणार्थ्यांना पटवून दिले. व जे प्रशिक्षणार्थी, लोक लसीकरणात विरोध करत असतील तर त्यांना प्रोत्साहित करा असा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेतील गट निदेशक श्री A. P. पाटील यांनी केले.
कार्यक्रमासाठी लागणारे बॅनर सूचना रंगाची विभागाचे श्री नितिन पालेकर व NSS कार्यक्रम अधिकारी श्री सुनिल दहिवलकर फलक सजावट व सेल्फी पॉइंट (मी दूत नव्हे मी योद्धा) ही संकल्पना मांडून( मी लसवंत )ही सेल्फी पॉइंट उभा करून प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. शिस्त व लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग श्री खैरनार यांनी दर्शवला. संस्थेतील सर्व गट निदेशक व निदेशक यांनी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणा दिली व कार्यक्रमाचा मुख्य उद्देश साध्य झाला. कार्यक्रमाचे आभार NSS कार्यक्रम अधिकारी श्री फिलिप्स डिसूजा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.