धारावी पोलीस ठाण्याची नवरात्री सणा निमित्त धारावीतील सर्व नवरात्री मंडळ प्रतिनिधी सोबत समन्वय बैठक

मुंबई – करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सरकारने यंदाही नवरात्रीऊत्सवाला नियमांची चौकट आखली. यात मूर्तीच्या उंचीपासून, मंडप आकार, आगमन व विसर्जनाचे नियम आहेत. उत्सवातील गर्दी करोनाच्या नव्या उद्रेकाला कारण ठरू नये, यासाठी धारावी पोलिसांनी धारावीतील सर्व नवरात्री मंडळ प्रतिनिधी सोबत समन्वय बैठक घेतली. यात मंडळ प्रतिनिधी कडून आलेल्या सूचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी नमूद करून करोनामुळे सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा होणे आवश्यकच आहे. करोनाबाबत मंडळेही जागरूक आहेत. संकटकाळात मंडळांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, स्वच्छ्ता मोहीम असे लोकोपयोगी उपक्रम राबवावेत असे धारावी पोलिसांकडून मंडळांना अहवान करण्यात आले. मूर्तीची उंची, पीओपीचा वापर, ध्वनिप्रदूषण, मिरवणुकांची आखणी, मंडप आकार अशा अनेक मुद्द्यांवर मंडळांना सूचना करण्यात आल्या. सदर कार्यक्रमास धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत पाटील , पोलीस निरीक्षक – विजय माने, स. उपनिरीक्षक – सुशील जाधव, पोलीस उपनिरीक्षक- इंगोले, बीट अंमलदार, जनसंपर्क मदतनीस गणेश इघे इत्यादी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com