हुनर बिझनेस नेटवर्क तर्फे महिला उद्योजकांची परिषद

मुंबई : हुनर ​​बिझनेस नेटवर्क गृहिणींना तसेच व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसायाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते आणि त्यानिमित्ताने पोलीस जिमखाना, मरीन ड्राइव्ह येथे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संस्थापक शगुफ्ता मुमताज आणि संस्थेचे संचालक आसिफ हसन यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच इतर कौशल्ये कशी विकसित करावीत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड भागातील महिलांना संघटित करून त्यांची उद्योजकता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com