मुंबई: गिरगावात डॉ डी बी मार्ग पोलीस ठाणे येथील खुले सभागृह कामाचा आज शुभारंभ वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप आर. खुडे यांच्या उपस्थितीत पार पडला. शिवसेना उपनेते तथा माजी केंद्रीय मंत्री, खासदार मा श्री अरविंद भाई सावंत यांच्या खासदार निधीतून डॉ डी बी मार्ग पोलीस ठाणे येथील खुले सभागृह कामाचा आज शुभारंभ करण्यात आला.सदर प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख श्री पांडुरंग सकपाळ महिला विभाग संगटका सौ जयश्री बाल्लीकर वरिष्ठ पोलीस अधिकारी मा प्रदीप खुडे साहेब,म विधानसभा संगटका सुरेखा उभाळे उपविभाग संगटका सौ लतिका पाष्ठे शिवसेना शाखाप्रमुख श्री शशिकांत पवार, म शाखा संगटका सौ वर्षा साबळे आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.