“आम्ही धारावीकर” या संघटनेतर्फे पोलिसांचा नागरी सत्कार

पोलिसांनी बजावलेल्या या कार्याला सलाम करण्यास व त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी “आम्ही धारावीकर” या संघटनेतर्फे शुक्रवार दि . 6 रोजी संध्याकाळी धारावी ट्रान्झिस्ट कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन मार्च महिन्यात लागू झाला. लोकांनी घरीच रहावे बाहेर पडू नये यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. त्यातच धारावीत कोरोना चे रुग्ण आढळून येऊ लागले आणि जगभरात खळबळ माजली धारावीत लाखो रुग्ण सापडतील व हजारो रुग्ण मृत्यू पावतील अशी चर्चा जोर धरू लागली होती. यामुळे सरकारी यंत्रणा कामाला होती. यात प्रामुख्याने स्थानिक पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. धारावी विधानसभा क्षेत्रातील धारावी पोलीस ठाणे व शाहू नगर पोलीस ठाणे मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून गस्त घालू लागले स्थानिक सामाजिक संस्था-संघटना, मंडळ व राजकीय पक्षांच्या सहकार्याने लोकांना शिस्त लावू लागले यात अनेक पोलिसांना कोरोना ची लागण झाली. काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यात शहीद झाले. धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे, शाहू नगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे, धारावी पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उप निरीक्षक रामेश्वर कामशेट्ये, अंजली वाणी व शाहू नगर पोलीस ठाणे चे महिला पोलीस नाईक अंजली शीलवंत यांचा यावेळी स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर कोरोना काळात धारावीत रहिवाशांची सेवा करत असताना कोरोना होऊन त्यात निधन झालेल्या रविंद्र तंगु सपकाळे यांच्या व काही वर्षांपूर्वी आजाराने निधन झालेले सामाजिक कार्यकर्ते रिझवान शेख यांच्या कुटुंबियांना धारावी नागरिक सेवा संघ संघटनेतर्फे प्रत्येकी रोख दहा हजार रुपये व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जॉन अलमेडा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष लिंबोरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मरियम रशीद, पॉल राफेल, खुर्शिद शेख, बाबाजी घुले, हर्षदा डोईफोडे व पारी राजन यांनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी – उमेश मुरकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com