राष्ट्रीय शालेय खेळांसाठी आता ११ वर्षा खालील मुले व मुली होणार सहभागी होणार! शालेय क्रीडा महासंघाचे निकष

मुंबई : शालेय क्रीडा महासंघाचे निकष नुसार आता राष्ट्रीय शालेय खेळांसाठी वयोमर्यादा आणि वर्गानुसार नवीन निकष वर्गीकरणा बाबत क्रीडा विभागाला सद्यस्थितीत खेळांच्या स्पर्धांचे नियोजन करावे लागेल. खेळाच्या तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धा होतात. जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना जिल्हास्तर, तसेच महानगरपालिका स्तर, असे एका खेळाच्या स्पर्धेचे दोनदा नियोजन करावे लागते. यात राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांच्या वेळापत्रकाचा विचार करावा लागतो. यात क्रीडा विभागाच्या कामात नवीन वर्ग वर्गीकरणाची भर पडली आहे. आतापर्यंत एका खेळासाठी साधारणतः १४, १७ व १९ वर्षे मुला-मुलींचे वयोगट असत पण आता नवीन वर्गीकरणात ११ वर्षा खालील मुले व मुली यांचा समावेश करण्यात आला आहे, या गटात इयत्ता ३ री ते ६ वी पर्यंतचे विद्यार्थी स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com