मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा ही करावा……!

(रत्नागिरी) कोकणातील शेती ही खरीप हंगामावर आधारित असणारी शेती आहे. निसर्ग वादळाने कोकणची दैना उडवली , अनेक घरांची पडझड, नुकसान झाले हो ते यातून कोकणी माणूस सावरतो न सावरतो तोच अवकाळी पडणार्‍या पावसाने भातशेतीचे पूर्ण नुकसान झाले ,आहे आणि त्यामुळे हाताशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखे झाले.अशातही कोकणी माणूस कधीच याचना न करणारा स्वाभिमानाने जगणारा आत्महत्येपासून दूर राहणारा या कोकणी माणसाला जर न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा देखील करावा आणि जे नुकसान झाले आहे हीनुकसान भरपाई कोकणातील शेतकऱ्यांच्या
थेट खात्यामध्ये जमा होईल अशी योजना करावी कारण आत्तापर्यंत केली जाणारी मदत कर्ज वाटप याचा फायदा मोठमोठे बागायतदार घेत आले आहेत सामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचत नाही याची खंत वाटते. या कोकणी माणसापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोचता पोचता मध्येच झिरपत झिरपत गायब होऊन जायची आणि ज्याला खरोखरच मदतीची गरज आहे तो शेतकरी मात्र याचना करतच जगायचा परंतु ही परिस्थिती आता कुठेतरी बदलली पाहिजे कोकणातील माणसाला न्याय मिळालाच पाहिजे
कारण न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध असणारे हे शासन आहे. सरकार आहे.

One thought on “मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा ही करावा……!

Comments are closed.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com