मुंबई शहर जिल्हा जुनिअर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २१ मध्ये चित्ता मार्शल आर्ट्सची उत्कृष्ठ कामगिरी

मुंबई : दि. १६ ऑक्टोबर २०२१ रोजी  ज्युनिअर्स आणि सब ज्युनिअर्ससाठी मुंबई किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल धारावी मुंबई -१७  येथे आयोजित करण्यात आली होती. स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर चे अध्यक्ष श्री .उमेश मुरकर यांनी सादर स्पर्धे  करीता संस्थेच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने मुलांची नावे नोंदविली गेली व जिल्हा संघटनेने स्पर्धेचे  आयोजन अतिशय व्यवस्थित पार पडले. सदर स्पर्धेत चित्ता मार्शल आर्ट्सने ३७ सुवर्ण पदक १७  रोप्या पदक आणि १ कांस्य पदक पटकावले व तसेच चित्ता मार्शल आर्ट्सने सांघिक चॅम्पियनशिप जिंकली . त्यांचे मुख्य प्रशिक्षक श्री रोहित भंडारी जे स्वतः एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेते आहेत. यांच्या प्रशिक्षणखाली चित्ता मार्शल आर्ट मध्ये अनेक प्रकारच्या मार्शल आर्ट्स, सेल्फ डिफेन्स आणि फिटनेसचे प्रशिक्षण दिले जाते . अहमदनगर येथे २२ ते २४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत राज्य स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यासाठी सर्व विजेत्या सहभागींना शुभेच्छा देतो. सर्व पदक विजेते अहमदनगरमधील स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई सिटी चे प्रतिनिधित्व करतील.

विजेते स्पर्धक : अब्बास हार्नेसवाला, हमजा भगत, नायरा सिक्कावाला, सकिना वाई धोराजीवाला, अमातुल्ला वाग्लावाला, दाऊद  वागलावाला, सारा रंगवाला, बुरहानुद्दीन रंगवाला, शौर्य म्हात्रे, हातिम. सुतेरवाला,अलीअसगर, सुतेरवाला, आयमान मकानी, असद अटारी, आदिल कागलवाला, कांचन निकम, अब्दुलकादिर अबीजार कागलवाला, मेहलम मुर्तुझा दिलावर, कुसाई होझेफा भोपाळवाला, झाहरा बरोट, फातमा तुझ जहरा कागलवाला, सारा कागलवाला, झैनाब बरोट, समर्थ सावंत, झोहेब सारंग, कुणाल सिंग, निशीत सिंग, सहवीर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com