मुंबई : कोरोनाच्या काळात संपूर्ण जगात नकारात्मक गोष्टी घडत असताना, माणसं माणसांपासून दुरावत असताना मुंबईच्या गिरणगावातील अभ्युदय नगरात सकारात्मक गोष्टी घडवण्यासाठी, सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी, विभागातील जनतेचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी शेखर छत्रे यांनी कला दालनाची संकल्पना विभागीय नगरसेवक दत्ताराम पोंगडे आणि शिवसेना शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांच्यापुढे मांडली. त्यांनीही चांगल्या कार्यासाठी आपल्याकडून आणि पक्षाकडून सहकार्य करण्याचा शब्द दिला आणि डिसेंबर २०२०च्या शेवटच्या रविवारी ‘अभ्युदय कला दालन’ विभागीय जनतेला मनोहर डंबे यांच्या शुभहस्ते खुलं करण्यात आलं. याच अभ्युदय कला दालनाला डिसेंबर २०२१च्या शेवटच्या रविवारी एक वर्ष पूर्ण झालं.
त्यानिमित्ताने अपूर्वा नृत्यालयाच्या संचालिका नृत्य विशारद रेखा घोलप आणि त्यांच्या शिष्यांनी नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमासाठी शिवडी विधानसभेचे विद्यमान आमदार अजय चौधरी, शिवसेना उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण, बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ताराम पोंगडे, शिवसेना शाखा क्रमांक २०५ चे शाखाप्रमुख जयसिंग भोसले, उपविभाग संघटिका रूपाली चांदे, महिला शाखाप्रमुख अनुराधा ईनामदार, शाखा समन्वयक कल्पना ओहळे, दिव्या दुखंडे, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शिवडी तालुका अध्यक्ष उमेश येवले, प्रभाग क्रमांक २०५चे माजी प्रभाग अध्यक्ष राजेंद्र खानविलकर भाजपा शिवडी विधानसभा वॉर्ड क्र २०५ अध्यक्ष श्री गणेश शिंदे, शिवडी विधानसभा सचिव अनिल यादव, सोशल मीडिया प्रमुख प्रतिक सावंत, पदाधिकारी विकास सकपाळ, युवा उद्योजक उदय अशोक पवार, दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन कोलगे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच विद्यमान आमदार अजय चौधरी यांचं स्वागत मनोहर डंबे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताला उत्तर देताना आमदारांनी सर्व आयोजकांचं तोंडभरून कौतुक केलं. विभागातील कलाकारांना अशाप्रकारचं व्यासपीठ निर्माण झालं आहे, त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा, असं आवाहन त्यांनी विभागीय जनतेला केलं.
अपूर्वा नृत्यालयाच्या संचालिका रेखा घोलप आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचा आस्वाद मान्यवरांसह विभागीय जनतेनेही घेतला. नृत्यांगनांनी घेतलेली मेहनत रसिकांपर्यंत पोहचत असल्याची पोचपावती त्यांच्या टाळ्यांमधून मिळत होती. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू नंदकुमार परब, महेश चोपडेकर यांनी सांभाळली. कार्यक्रम सुरू झाल्यापासून हजर झालेला प्रेक्षकवर्ग कार्यक्रमाची यशस्वी सांगता होईपर्यंत दालनात हजर होता, हे विशेष.
पक्ष विरहित असलेल्या ‘अभ्युदय कला दालन’ ला सर्वच पक्षांच्या पदाधिकार्यांनी आवर्जून भेट दिली आणि आपल्या मनोगतातून ‘अभ्युदय कला दालन’च्या वर्षपूर्ती निमित्त खूपखूप शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या काळात त्यांच्याकडून जे सहकार्य करता येईल ते करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं.
कार्यक्रमासाठी प्रकाश ओहळे, नितीन कोलगे, विनय भोजने, सुदाम परब, विनायक जाधव, गिरीश कारेकर यांनी मोलाचं योगदान दिलं.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी डॉ. प्रागजी वाझा, सुदाम परब, चंद्रकांत परब, अजित देसाई, प्रमोद कदम, नंदा मस्के, सुनिता गोरे, साक्षी जाधव, शशिकला जयस्वार, सिमा, वेदश्री जाधव, सुप्रसिद्ध ढोलकीपटू बुवा ढोरे, गायिका वैभवी परब हेदेखील उपस्थित होते.