सामाजिक जाणिवेतून ‘वाढदिवस’ साजरा

मुंबई : शहरातील सुखवस्तू कुटुंबात राहणाऱ्यांना वाढदिवस म्हंटलं की जंगी पार्टी करावीशी वाटते, पण गरिबांचं काय? रुग्णांचं काय? त्यांचे प्रश्न समजून कोण घेतं? हेच सामाजिक भान जपण्याबरोबरच इतरांमध्ये जाणीव निर्माण व्हावी, यासाठी महेंद्र सातपुते यांनी गरीब, रुग्ण, कष्टकरी यांच्यासोबत अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.
पाश्चात्त्य पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृतीबरोबरच दैनंदिन जीवनात अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरही पडला आहे. वाढदिवसाला औक्षण करण्याची पद्धत बदलून त्याची जागा केक कापणे आणि मेणबत्ती फुंकणे यांसारख्या पाश्चात्त्य पद्धतींनी घेतली. मात्र या परंपरेला फाटा देत महेंद्र सातपुते यांनी मुंबईच्या परेल परिसरातील रूग्णालयांच्या रुग्णांना जेवण देऊन आपला वाढदिवस आनंदाने साजरा केला.
सुशिक्षित होणे म्हणजे फक्त पाठय़पुस्तकातील प्रकरणांची घोकंपट्टी करणे नसून, आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे. महेंद्र सातपुतेंच्या वाढदिवसाच्या उपक्रमात मित्रपरिवारातील सर्वच जणांनी हिरिरीने सहभाग घेतला.आयएएस किशोर गजभिये, माजी नगरसेवक दिलीप शिंदे, युवा उद्योजक उदय पवार, भारतीय काँग्रेस पक्षाचे गोरख कांगणे, भरत शिंदे, मंगेश थोरात, सुभाष जाधव, श्रीधर करंजेकर, स्वप्नील जाधव, अक्षय जाधव यांनी कार्यक्रमासाठी लागणारी सर्व तयारी केली. तसेच अशाप्रकारचे भविष्यातदेखील वाढदिवस साजरा करणार असल्याची पुस्तीही जोडली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com