कॅडेट अँड ज्युनिअर राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे पुण्यात शानदार उद्घाटन

पुणे : शिव छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बॉक्सिंग हॉल, बालेवाडी माळुंगे पुणे येथे दिनांक २१ ते २५ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेसाठी भारतातील २८ राज्यातून जवळपास १४०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे, सदर स्पर्धेत ततामी चे तीन इव्हेंट व रिंग स्पोर्ट्स चे तीन असे एकूण सहा इव्हेंट होणार आहेत, तसेच म्यूसिकल फॉर्म व क्रिएटिव्ह फॉर्म हे इव्हेंट पण होणार आहेत, सदर स्पर्धेचे उद्घाटन शानदार व उत्साहात करण्यात आले,

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय अतिथी वाको इंडिया चे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल, पिंपरी-चिंचवड चे माजी महापौर नितीन आप्पा काळजे, वाको इंडिया चे जनरल सेक्रेटरी डॉक्टर संजय यादव, उपाध्यक्ष कार्तिक डाकवा, खजिनदार अभिषेक जैन, किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष नीलेश शेलार, सचिव धीरज वाघमारे, प्रकश ढोरे- संचालक पी एम पी एल व नगरसेवक, बजरंग काळजे (अध्यक्ष शिवप्रेमी सेवा संघ), पुणे महानगर, सीनिअर पीआय सावंत, नितीन शेलार, सुरेश बाबु, दुर्योधन भापकर, तसेच राज्याचे प्रतिनिधी, अनिल शर्मा – दिल्ली,
सिद्धार्थ भुलेघुरे- गुजरात, पूजा हर्षा- कर्नाटका, विश्वनाथ रॉय – वेस्ट बंगाल, सागर सुर्वे- गोवा, सईद आलम- मध्यप्रदेश, दुर्गा टेनकी – आंध्र प्रदेश, हिरण्य बरुआ – आसाम, पुष्पेश्वर गुजर- राजस्थान, आकाश गुरुध्वन – छत्तीसगड, बाबिल खरशहरोह- मेघालया, पिनाकी चक्राबोर्ती – त्रिपुरा, रमण जया लुलु – तेलंगणा, इलानगोवन – पोंडीचेरी, नसिरुद्दिन – उत्तर प्रदेश, विवेक ए एस – केरला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com