मुंबई : तालकटोरा इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे २ ते ६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पार पडलेल्या इंडियन ओपन किकबॉक्सिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रोशन शेट्टी याने ५७ किलो वजनी गटात भाग घेत पॉइंट फाईट या प्रकारात कांस्य पदक मिळवत स्पर्धेत आपली छाप पाडली व महाराष्ट्राचे तसेच मुंबई शहराचे नाव रोशन केले, शितो रियू स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन व स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर या संस्थेमधून प्रशिक्षक उमेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. मुरकर सर यांच्याकडे ओ एल पी एस हायस्कुल च्या कराटे क्लास मध्ये वयाच्या ९ वर्षाचा असल्या पासून करते व किक बॉक्सिंग चे धडे गिरवण्यास सुरवात केली व आतापर्यंय अनेक पदके जिंकली आहेत.
दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता बंट्स संघ मुंबई या संस्थेने यांनी रोशन ला आर्थिक साहाय्य दिले. पदक विजेत्या कामगिरी मुळे रोशन वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
