चिपळूण: डेरवण येथे आज पल्लवी प्रभाकर चव्हाण राहणार सती येथील भगिनीसाठी तातडीने आवश्यक असणाऱ्या बी पॉझिटिव रक्तासाठी चिपळूणच्या पाग विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि ब्लड लाईनचे शिलेदार श्री. विनायक सावंत , ब्लड लाईनचे युवा रक्तदाते आणि वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रक्तदान करणारे श्री.पराग राजेश सुतार तसेच श्री.असद कयूम कापडी या 3 रक्तदात्यांनी समर्पित भावनेने रक्तदान केले. सदर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी या तीन रक्तदात्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे सगळीकडेच कौतुक होत आहे. या तिन्ही रक्तदात्यांचा डेरवण रक्तपेढीच्या अधिकारी श्रीमती झुंजरवाड मॅडम, सौ.जानवी घोरपडे, ब्लड लाईनचे प्रमुख श्री.अमोल टाकळे, सदर रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रेरणा देणारे ब्लडलाईन ग्रुपचे प्रमुख शिलेदार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.सुयोग चव्हाण तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेश सुतार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष गौरव करण्यात आला. सदर रुग्णाचे नातेवाईक श्री. प्रभाकर चव्हाण तसेच ब्लडलाईन ग्रुपच्या वतीने श्री. अमोल टाकळे यांनी या सर्वांचे विशेष आभार मानले