वसई : सोनाक्षी फिल्म प्रोडक्शनचे अध्यक्ष प्रफुल पाटील यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात कौशिक जाधव यांना बेस्ट आर्टिस्ट सन्मान रामसूमीरन भिसेशन बढाई यांच्या हस्ते देण्यात आला. वाडा येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमासाठी डॉ. भवानजी आगे पाटील (उपविभागीय अधिकारी, वाडा), दत्तात्रेय भा. पाटील (माजी नायब तहसील, वाडा), डॉ. उद्धव कदम (तहसीलदार वाडा), रामसूमीरान भिसेसन बढाई (माजी सैनिक अधिकारी) परेश पाटील, दर्शना जिरवा, भैरवी जाधव, वैभवी मोकाशी, विष्णू कुऱ्हाडे, प्रभाकर पाटील, दिपक गोळे, यशवंत तेलम आदी मान्यवर उपस्थित होते. कौशिक जाधव यांचे पालघर जिल्ह्यात कौतुक होत आहे.