
सध्या चाललेल्या कोरोनाच्या लॉक डाउन च्या पार्श्वभूमीवर बांद्रा येथील पेन्शन कार्यालय मध्ये लाइफ सर्टिफिकेट सबमिट करण्यासाठी व इतर पेन्शन बाबतचे कागदपत्र सबमिट करण्यासाठी नागरिकांची लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत, बऱ्याच वयस्कर लोकांच्या तोंडी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त होत होती. बांद्रा येथील पेन्शन कार्यालयात पेन्शन संदर्भातील कामासाठी संपूर्ण मुंबईतून लांबून वरिष्ठ नागरिक येत असतात, हि बाब लक्षात घेऊन शासनाने काही ठोस उपाय योजना करणे जरुरी झाले आहे.