मुंबई : पोलीस आणि जनता यांमध्ये संवाद साधण्याकरिता आज अनेक पोलीस स्टेशन मधून वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत. मोहल्ला कमिटी. त्याचप्रमाणे निर्भया पथक त्याच बरोबर खास लहान मुले व स्त्रियांसाठी स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकाद्वारे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी व्याख्याने देऊन उद्बोधन करून विद्यार्थ्यांमध्ये असणारी भीती दूर करण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. दा. भ.मार्ग. पोलीस ठाणे (पो. उपनिरीक्षक) सर्वदा सावळे. मॅडम त्याचप्रमाणे (पो. कॉन्स्टेबल) एस ए घाडगे यांनी विद्यार्थ्यांना
•लहान मुलांची काळजी व हेल्पलाईन क्र १०९८ बाबत
•स्वसंरक्षणबाबत घ्यावयाची काळजी,
•स्त्रियांनी घ्यावयाच्या काळजी,
•बालका विरुद्ध चे गुन्हे
•बालकांचे लैंगिक शोषण
•निर्भया पथक स्थापना व हेल्पलाईन १०३ बाबत
•एकट्याने प्रवास करताना घ्यावयाची काळजी
•महिलांचे छेडछाडीचे गैरप्रकार इत्यादी बाबत घ्यायची काळजी व दक्षता
याबाबत मार्गदर्शन केले तसेच काही अनुचित प्रकार घडले किंवा निदर्शनास आले अथवा कोणत्याही प्रकारची असुरक्षितता वाटल्यास तात्काळ पोलीस मदत क्रमांक १००, १०३, १०९८ यावर संपर्क करून तात्काळ मदत घेण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. .त्याच प्रमाणे मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठी करणे मोबाईलचा दुरुपयोग होता कामा नये इत्यादी गोष्टींवर देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती उमराळे मॅडम यांनी डॉ दा. भ. मार्ग. पोलीस ठाणे यांचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीयुत राजा बिडकर यांचे या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
