ओंकार सेवा मंडळ, सामाजिक सभागृह
मौजे उक्षी ता. जि. रत्नागिरी. येथे प्रथम शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यावेळी कृषीसहायक-उक्षी अर्चना गायवळ यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली, मंडळ कृषिअधिकारी श्री. जयेश.एस.काळोखे यांनी शाश्वत शेतीची गरज व महत्त्व याविषयी माहिती दिली. कृषी तंत्रसहाय्यक बापुराव शेंडगे यांनी जमिन आरोग्य पत्रीका आणि माती परीक्षण व त्याची गरज काय या बद्दल माहिती दिली .तसेच कृषी सेवक-पाली श्री. सुनिल कुरंगळ यांनी माती नमुना कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा ) श्रीम. पाटिल यांनी विकेल ते पिकेल योजना याविषयी मार्गदर्शन केले .तसेच कृषी पर्यवेक्षक पाली-रघुनाथ डवरी यांनी सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन केले,कृषी सेवक-तरवळ श्रीम. रूपाली यांनी एमआरईजीएस फळबाग लागवड व भाऊसाहेब फुंडकर योजनेबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्याच अनुषंगाने कृषी विभागाच्या इतर योजनेची देखील माहिती देऊन शेतकर्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यात आले.

सदर कार्यक्रमास कृषी विभागातील कर्मचारी कृषीसहायक-वेळवंड सुरेश येझरे , कृषिसेवक-निवळी.श्री. नितीन रांजून तसेच गावचे सरपंच श्री. मिलिंद खानविलकर व उपसरपंच श्री. हरिश्चन्द्र बंडबे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उक्षी तसेच ओंकार सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उक्षी चे उपसरपंच श्री. हरिश्चन्द्र बंडबे यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थानचे व मान्यवरांचे आणि सर्व शेतकरी वर्गाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
स्थानिक प्रतिनिधि – सुधीर घाणेकर