संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण कोरोना लस नेमकी किती रुपयांना मिळणार याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत होते. यावर आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाची लस ही मोफत दिली जाणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. भारतात कोरोना लसीकरणाला लवकरच सुरूवात होणार आहे आणि यासाठी केंद्र सरकारकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. आज (२ जानेवारी ) संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाचे ड्राय रन होत आहे. लसीकरणाच्या ड्राय रनचा आढावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला आणि त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, संपूर्ण देशभरात कोरोनाची लस मोफत दिली जाईल. आज देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु आहे. याआधी देशातील चार राज्यांतील दोन दोन जिल्ह्यात लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्राय रन घेतला होता. राज्यातील नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये हे ड्राय रन सुरु झालं आहे. या चारही जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्कर्संना पहिल्यांदा कोरोनाची लस दिली गेली आहे. कोविडच्या लसीकरणाची जालन्यामध्ये रंगीत तालीम घेतली जात आहे. जालन्यात स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे हे यावेळी उपस्थित आहेत. आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली.