
कोरोनाच्या संकटाच्या काळा मुळे सर्वच लहान मुलांचे शारीरिक व्यायाम प्रकारा कडे दुर्लक्ष झाले आहे तसेच रोजच्या जीवनमानात झालेल्या बदलावामुळे या लहान मुलांमध्ये योग व व्यायाम या बद्दल उदासीनता पसरू नये याकरिता आर्ट ऑफ लिव्हीग या परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुनीता बी पिल्ले, राजेंद्र एम रेड्डी, शामू मेत्रे, दीपक गोहेल, प्रकाश शिंदे , शंकर गोरुवले, ऐश्वर्या सकाते, सुनिता चव्हाण, रेश्मा परब या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज पासून धारावीतील मनोहर जोशी विद्यालयात मुलांसाठी दिनांक २०, २१ व २२ नोव्हेम्बर अशा तीन दिवसांचा योग् व स्वरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे, या सामाजिक उपक्रमात शितो रियू स्पोर्ट्स करटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन या संस्थेचे प्रशिक्षक विघ्नेश मुरकर, विजय पडियाची, सानिया कोलते, साहिल देवघरकर, शुभम आव्हाड, रेक्स मेलगिब्सन यांनी प्रशिक्षणार्थीकडून स्वरक्षण कलेचे धडे गिरवून घेतले व मुलांनीही या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद देत शिबिराचा आनंद घेतला. प्रतिनिधी – उमेश मुरकर