डोंबिवली – डोंबिवली म्हात्रे नगर परिसरात कचरू भवन १ मध्ये राजेश नंदकुमार रेळे ही अपंग व्यक्ती राहते. त्याचे चालू महिन्याचे सातशे रुपये बिल बाकी होते. सदर व्यक्ती कामासाठी घरातून बाहेर गेली असता महावितरणचे कर्मचारी म्हात्रे नगर परिसरात आले असता कचरू भवन येथे राजेश नंदकुमार रेळे हे रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्यांचे मीटर त्यांनी काढून नेले. मिटर काढताना वास्तविक आजूबाजूला सांगणे गरजेचे आहे. पण न सांगता असेच मीटर हे कर्मचारी घेऊन जाऊ शकतात का? हा राजेश रेळे यांना प्रश्न पडला. ते तडक डोंबिवली पूर्व येथे असलेल्या महावितरणच्या वीज बिल केंद्रात गेले. तिथे त्यांना बिल भरा असे सांगण्यात आले. तिथे असलेले अधिकारी विशाल यांनी असहकार्याची भूमिका घेत ते तडक बाहेर निघून गेले. जबाबदार अधिकाऱ्याचे असे वर्तन पाहून राजेश यांना मानसिक त्रास झाला. निराश होऊन राजेश हे घरी निघत होते, परंतु तळमजल्यावर असलेले प्रमोद पाटील नावाचे कार्यकारी अभियंता असलेले हे अधिकारी त्यांनी राजेश यांना सहकार्य करत नीट माहिती समजावून सांगितली. त्याने बिल भरताच त्यांना २३५ रुपये वीज जोडणीचा दंड भरा. तेवढी व्यक्ती पुन्हा डोंबिवली वीज भरणा केंद्र ते म्हात्रे नगर येथे जाऊन पैसे घेऊन पुन्हा दंड भरण्यास आली. तिथे कुठल्याही कर्मचार्याने त्यांना नीट उत्तरे दिली नाही. महावितरणचे आता नवीन कायदे काय आहेत ते कमीत कमी त्यांना सांगणे वीज महावितरणच्या कार्यालयाने गरजेचे होते. एका अपंग व्यक्तीला झालेल्या या मनस्तापाबद्दल जबाबदार कोण? कमीत कमी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून अशा प्रकारांना आळा घालावा. कर्मचाऱ्यांची चाललेली ही अरेरावी थांबवावी. घरात कोणी नसताना कमीत कमी आजूबाजूला वीज कर्मचाऱ्याने सांगणे जरुरीचे आहे. वीज कंपनीतील महत्त्वाचे अधिकारी यामध्ये लक्ष घालून ग्राहकांची होणारी ससेहालपट थांबवतील अशी अपेक्षा ग्राहक करताना दिसत आहेत. तुम्ही वापरलेल्या वीज बिलाची भरलीच पाहिजे. परंतु वीज बिल कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी नीट सहकार्याची भूमिका घेऊन त्यांच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा त्यांच्या समस्या सोडवाव्यात.