मौजे मुसलोंडी बारगोडेवाडी विकास मंडळाला वर्ष २०२० मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्त अमृत महोत्सवी वर्ष सोहळा साजरा करण्यात आला. दोन वर्ष स्थगित राहिलेला हा अमृत महोत्सव सोहळा या वर्षी म्हणजे ४ मे ते ७ मे २०२२ रोजी संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ●४ व ५ मे २०२२ भव्य टेनिस क्रिकेट सामने बारगोडेवाडी जांभूळ खामडी मैदान येथे आयोजित करण्यात आले

● ६ मे २०२२ शुक्रवार
◆ विविध क्षेत्रातील कामगिरी, सेवा देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला
त्याचप्रमाणे माहेरवशींनीचा सत्कार
७ मे २०२२ शनिवार
◆श्री सत्यनारायण महापूजा
माहेशजी नाटेकर ( माजी अध्यक्ष – रत्नागिरी जिल्हा परिषद) यांच्या हस्ते
◆स्मरणिका प्रकाशन सोहळा पार पाडण्यात आला

तसेच ◆हळदीकुंकू सोहळ्याच्या
प्रमुख पाहुण्या
● नेत्राताई न. ठाकूर ( माजी सदस्या रत्नागिरी जिल्हा परिषद)
● प्रविणजी वेल्हाळ( सरपंच- नरवण ग्रामपंचायत)
● सचिनजी जाधव युवा सेना
इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कार्यक्रमांची सांगता करण्यात आली या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा लाभल्या.