ऑल इंडिया शितो रियू स्पोर्ट्स कराटे अससोसिएशन च्या ब्लॅक बेल्ट परीक्षा संपन्न ! पार्थ, उन्नती, सिमरन, उषा, अंकित हे ब्लॅक बेल्ट धारक

ऑल इंडिया शितो रियू स्पोर्ट्स कराटे अससोसिएशन च्या माध्यमातून नुकत्याच नागाव, अलिबाग येथे घेण्यात आलेल्या डिग्री व ब्लॅक बेल्ट परीक्षा मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून आलेल्या मुले व मुलींमधून मुंबई जिल्ह्यातील सेकंड डिग्री साठी पार्थ सरवणकर, उन्नती पाटील तर फर्स्ट डिग्री साठी सिमरन सातोस्कर, उषा तेवर, अंकित मोहिते हे यशस्वी रित्या पास झाले. या सर्वांचे पत्रकार व शितो रियू स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष उमेश ग. मुरकर यांनी बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शिहान प्रकाश नकाशे यांनी या प्रसंगी भविष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com