जौनपूर : अखिल भारतीय आंतरविद्यापीठ किकबॉक्सिंग स्पर्धा महिला २०२१-२२ हि स्पर्धा २४ ते २६ मार्च २०२२ या कालावधीत पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूर येथे पार पडल्या. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूर हे होते.
सदर स्पर्धेत १४० महिला खेळाडू विविध २० विद्यापीठामधुन या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. भारतातील सर्व राज्यातून पुष्पेंद्र गुर्जर, शुभम मिश्रा, जयेश चोगले, दीक्षा जैन, पूजा पांडे, दीपक, मनोज पटेल, संदीप यादव, लोगु पद्मनावन, जसवंत सिंग, सचिन कुमार हे सर्वोत्कृष्ट पंच आमंत्रित होते.

महर्षि दयानंद विद्यापीठ, रोहतक यांनी पहिले स्थान पटकावले तर दुसरे स्थान वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूर याना मिळाले. तिसरे स्थान – काशी विद्यापीठ विद्यापीठ, चौथे स्थान – अभिनाश लिंगम विद्यापीठ तामिळनाडू याना मिळाले.

