औरंगाबाद: ब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या ५० जणांना ‘हुशू कुंग फू चे तीन तासांचे प्रशिक्षण देण्यात आले. अनुज पांडे आणि देवेंद्र कारले या दोघांनी यामध्ये प्रात्यक्षिकासह स्वसंरक्षणाचे धडे दिले. समाजात वाढत चाललेल्या घटनांमुळे प्रत्येकाला स्वसंरक्षण आले पाहिजे, या उद्देशाने प्राधिकरणाने हे आयोजन केले होते. प्राधिकरण संचालक डी. जी. साळवे यांच्या मार्गदर्शनात विमानतळ क्वार्टर्स येथील कम्युनिटी सेंटरमध्ये हे प्रशिक्षण झाले. या वेळी उपस्थितांनाही प्रत्यक्षिकांचा लाभ घेतला.
कुटुंबीयांची सुरक्षितता गरजेची अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. महिलाच नव्हे तर पुरुषही आता सुरक्षित नाहीत. याची प्रचिती आपल्या शहरात येते आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण गरजेचे आहेत. ‘हुशू कुंग फू’ हा नवा आणि सहज आत्मसात करता येईल असा प्रकार आहे, असे आयोजक रेखा पवार म्हणाल्या.