अहमदनगर किकबॉक्सिंग असोसिएशन ने राष्ट्रीय स्पर्धेत २ रौप्य पदक पटकावली

गोवा : वाको नॅशनल स्पर्धेत संपूर्ण भारतातील २३ राज्यांचा सहभाग होता. दयानंद बांदोडकर क्रीडा संकुल, मापुसा, गोवा येथे खेळताना अहमदनगर किकबॉक्सिंग असोसिएशन ने राष्ट्रीय स्पर्धेत संदीप बोरुडे रौप्य पदक,
श्रेयश शिरसुल रौप्य पदक, संदीप सरोदे व गोकुळ सोलाट या खेळाडूंनी सहभाग घेत २ रौप्य पदक मिळवित अहमदनगर चे नाव उंचावले. सदर स्पर्धा वाको इंडिया नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१ सिनियर अँड मास्टर्स दिनांक २६ ते २९ पार पडली या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार सर, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे नितीन शेलार सर, प्रशिक्षक सचिन मकासरे, गणेश कुसाळकर, यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com