काळाकिल्ल्यावर शोककळा

(धारावी, मुंबई) धारावीतील काळा- किल्ला परिसरात राहणारा विपुल आगवणे सोमवारी रात्री आपल्या तीन मित्रांसह परेल मधील देवीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या होंडा सिटी कार ने निघाला होता. देवीचे दर्शन घेऊन मध्यरात्री १ च्या दरम्यान सर्वजण घराकडे निघाले. दादर खोदादाद सर्कल उड्डाणपुलाच्या उतारावरून माटुंगा उड्डाणपुलाच्या दिशेने जाताना यांच्या भरधाव होंडा सिटी कारने त्याच दिशेने जाणाऱ्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. दादर टीटी खोदादाद सर्कल उड्डाणपुलावरून उतरत असताना विपुलचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याच मार्गावरून सायनच्या दिशेने निघालेल्या डंपरला कारची जोराने धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कार्य पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कारमधून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचे दरवाजे लॉक झाले होते. त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून दरवाजे कापून जखमींना शिव रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात विपुलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य तिघांना अतिदक्षता विभागात दाखल केले. किरकोळ जखमी झालेल्या सौरभला गोरे याला प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. सदर घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या भीषण अपघातात होंडा सिटी कारचालक विपुल नाना आगवणे (२१) जागीच ठार झाला. कारमधील चेतन अनिल थोरात (३१), राहुल सुभाष कारंडे (२२), सौरभ संजय गोरे (२१) जबर जखमी झाले असून त्यांच्यावर शिव रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी माटुंगा पोलीस तपास करत आहेत. संपूर्ण काळाकिल्ला परिसरात या घटनेबद्दल नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com