मुंबई : शिवाजी नगर, गोवंडी या विभागातील कोविड लसीकरण घेण्याचं अल्प प्रमाण लक्षात घेता तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या पुढाकाराने तसेच कार्यक्रमाच्या समन्वयक नसरीन शेख यांच्या नेतृत्वाखाली पद्मा नगर रोड नंबर १४, बैगनवाडी, शिवाजी नगर, गोवंडी, मुंबई येथे मोफत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
सूर्या हॉस्पिटल यांच्या माध्यमातून तसेच सावली सेवा फाउंडेशन यांच्या सहकार्यातून शिवाजी नगर, गोवंडी या विभागातील सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या तसेच असंघटित, कचरा वेचक, नाका कामगार, कष्टकऱ्यांना या मोहिमेचा लाभ घेता आला.
दिवसभर पाऊस असून देखील सकाळ पासून लोकांनी भर पावसात भिजत मोठ्या प्रमाणात रांग लावून लसीकरण मोहिमेत उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन नसीम खान यांनी केले. संकल्प संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कोविड लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संतोष सुर्वे, सनोज वाल्मीकी, सविता हेंडवे, वनिता सावंत, साजीद खान, अंजुम पठाण, यास्मिन खान, नाजमा शेख, सलाम शेख, आशा शेख, भारती मगरे, मोहन निर्भवणे, साजीद पठाण, राशीद पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले.