मुंबई : दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक आणि मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तसंपादक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते ८३ वर्षांचे होते.. माझ्या लहानपणी टीव्हीवर बातम्या म्हटलं की दूरदर्शन हे समीकरण होतं.. त्यात वाद संवाद नावाचा एक कार्यक्रम लागायचा.. त्याचे व्हिडिओ उपलब्ध असतील तर नक्की पाहा.. शांत, संयमी, अजिबात गोंगाट नाही.. टू द पॉईंट प्रश्न विचारत वृत्तनिवेदन काय असतं ते हा माणूस शिकवून गेला..महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे माजी खातेप्रमुख, पुण्याच्या सिम्बोयसीस इन्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संस्थापक.. १८ हून अधिक पुस्तकांचे लेखक..Phd चे गाईड.. इतकं भरीव कार्य अविरतपणे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी सुरु ठेवलं.. पत्रकारितेतला एकेक क्षण ते जगले..हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले..
पंचनामा परिवारातर्फे डॉ. विश्वास मेहेंदळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.